-
‘लव्ह आज कल २’ फेम अभिनेत्री आयुषी शर्माने गुपचूप लग्न उरकलं.
-
अभिनेत्रीने बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टरशी लग्नगाठ बांधली आहे.
-
आरुषीने तिच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
‘काला पानी’ या वेब सीरिजमध्ये शेवटची दिसलेली आरुषी शर्माने आयुष्यभरासाठी तिचा जोडीदार निवडला आहे.
-
अभिनेत्रीने १८ एप्रिल रोजी हिमाचल प्रदेशमध्ये लग्नगाढ बांधली. तिने प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर वैभव विशांतशी गुपचूप लग्न केलं.
-
आरुषी आणि वैभवने अत्यंत खासगी सोहळ्यात सात फेरे घेतले. या लग्नाला फक्त त्यांचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते.
-
आरुषी शर्मा पेस्टल रंगाचा लेहेंग्यामध्ये खूप सुंदर दिसत आहे. वैभवनेही खूप सुंदर अशी नक्षीदार शेरवानी घातली आहे.
-
दोघांचे फोटो समोर आल्यावर चाहते कमेंट्स करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
-
आरुषीचा पती वैभव विशांतबद्दल बोलायचं झाल्यास तो बॉलीवूडमधील प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आहे.
-
आत्तापर्यंत त्याने ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘पीके’, ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ आणि ‘बदलापूर’ सारख्या जवळपास ५० चित्रपटांसाठी कास्टिंगचं काम केलं आहे.
-
विशेष म्हणजे वैभवने ‘काला पानी’ या वेब सीरिजसाठी कास्टिंग डायरेक्टर म्हणूनही काम पाहिलं होतं, यात आरुषीनेही काम केलं होतं.
-
आरुषी आणि वैभवची केमिस्ट्री इथूनच सुरू झाली आणि आता ते लग्नबंधनात अडकले, असं म्हटलं जातंय.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”