-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी यांना प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळत आहे. नकारात्मक बाजू असलेली तरी मिलिंद गवळींनी साकारलेला अनिरुद्ध प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.
-
मिलिंद गवळींच्या कामाचं जितकं कौतुक होतं असतं. तितकंच त्यांच्या सोशल मीडियावर पोस्टचं देखील होतं असतं.
-
मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सुंदर आणि वाचनीय अशा पोस्ट शेअर करत असतात.
-
काही दिवसांपूर्वी मिलिंद यांनी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणींना उजाळा देणारी पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी या अभिनेत्यांबरोबरच्या कामाचा अनुभव शेअर केला होता.
-
या पोस्टमधून मिलिंद गवळी यांनी दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्यासंबंधित न माहित असलेली एक गोष्ट सांगितली होती; ती नेमकी काय होती? जाणून घ्या…
-
मिलिंद गवळींनी लिहिलं होतं, “विजू मामांबरोबर मी जवळजवळ आठ एक सिनेमे केले. मराठी इंडस्ट्रीमधले ते सगळ्यात बिझी स्टार होते.”
-
“ऐकावेळेला त्यांचे सहा-सात सिनेमे चालूच असायचे, असा हा एकमेव स्टार होता; ज्याच्या डबिंगसाठी, ‘ते’ जिथे शूटिंग करत असतील, तिथे अरेंजमेंट, तिथे डबिंग स्टुडिओ बूक केला जायचा,” असे मिलिंद गवळी म्हणाले.
-
पुढे मिलिंद गवळी म्हणाले, “बरं त्यांनी कधीही मोबाईलचा वापर केला नाही. त्यांच्याकडे मोबाईलच नव्हता. फारच सुपर टॅलेंटेड असा कलाकार विजू मामा होते. ‘तू तू मी मी’ या एका नाटकात त्यांनी १४ भूमिका केल्या होत्या.” (सर्व फोटो सौजन्य – मिलिंद गवळी फोटो इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”