-
प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री अपर्णा दास लग्नबंधनात अडकली आहे.
-
तिचा पती हा सुप्रसिद्ध मल्याळम अभिनेता दीपक परंबोल आहे.
-
अपर्णा व दीपक यांनी आज (२४ एप्रिल) लग्नगाठ बांधली.
-
केरळमधील गुरुवायूर मंदिरात मल्याळम रितीरिवाजांनुसार दीपक आणि अपर्णाचा विवाह झाला.
-
केरळमध्ये झालेल्या या पारंपारिक लग्नाला फक्त दीपक आणि अपर्णा यांच्या कुटुंबातील सदस्य आणि खास मित्रांनी हजेरी लावली होती.
-
अपर्णाने लग्नात पांढरी साडी नेसली व त्यासोबत मॅचिंग हिरवं ब्लाऊज घातलं होतं. तर दीपकने पांढरी लुंगी व शर्ट घातला होता.
-
लग्नाच्या फोटोंमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत.
-
अपर्णा २८ वर्षांची आहे तर दीपक ३५ वर्षांचा आहे.
-
२०१९ मध्ये आलेल्या ‘मनोहरम’ सिनेमाच्या सेटवर त्यांची भेट झाली होती.
-
अपर्णा दासने मल्याळम चित्रपट ‘नजन प्रकाशन’मधून पदार्पण केलं आणि मनोरम या चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली. थलपथी विजयच्या ‘बीस्ट’ या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
तर, दीपकचा मंजुमेल बॉइज २०२४ सर्वात हिट मल्याळम चित्रपटांपैकी एक आहे.
-
(सर्व फोटो – अपर्णा दास व Elementricx इन्स्टाग्रामवरून साभार)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख