-
‘चेकमेट’, ‘सावरखेड एक गाव’ अशा बऱ्याच चित्रपटांमुळे अभिनेत्री सोनाली खरे घराघरांत लोकप्रिय झाली.
-
सोनालीने वैयक्तिक आयुष्यात बिजय आनंद यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
-
सोनालीचे पती बिजय आनंद बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात.
-
‘शेरशाह’, ‘IB 71’, ‘आदिपुरुष’ अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे.
-
मध्यंतरी सोनाली आणि तिच्या पतीमध्ये तब्बल २७ वर्षांचं अंतर आहे अशा चर्चा सर्वत्र चालू होत्या. परंतु, अभिनेत्रीने अनेकदा या सगळ्या अफवा आहेत असं सांगितलं आहे.
-
सोनालीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सगळ्या खोट्या चर्चांवर स्पष्टीकरण देत टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
-
“आमच्यामध्ये २७ वर्षांचं अंतर अजिबात नाही. माझा जन्म आहे ५ डिसेंबर १९७८ आणि माझ्या नवऱ्याचा जन्म आहे १९७० सालचा.” असं सोनालीने सांगितलं.
-
सोनाली पुढे म्हणते, “आता मी आमच्या जन्मतारखा खूप उघडपणे सगळीकडे सांगते. खरंतर बायका त्यांचं वय असं उघडपणे सांगत नाहीत. पण, मी मात्र सांगते कारण, आमच्यात फक्त ८ वर्षांचं अंतर आहे.” या दोघांच्या लेकीचं नाव सनाया आहे.
-
“जर दोन व्यक्तींना एकमेकांबरोबर आयुष्य घालवण्यासाठी त्यांची साथ योग्य वाटत असेल, तर त्याच्यासमोर जात-पात, वय अशा काहीच गोष्टी नसतात. त्यामुळे मध्ये जे काही सगळीकडे येत होतं ते खोटं आहे आमच्यात फक्त आठ वर्षांचं अंतर आहे.” असं सोनाली खरेने स्पष्ट केलं. ( सर्व फोटो सौजन्य : सोनाली खरे इन्स्टाग्राम )
लोकांच्या जीवाशी खेळ! महिलांनो बाजारातून कोबी विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल