-
krissann barretto nathan karamchandani wedding : लोकप्रिय टीव्ही मालिका ‘कैसी ये यारियां’ व ‘इश्कबाज’ यातून अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री क्रिसन बॅरेटोने लग्न केलं आहे.
-
अभिनेत्रीने तिचा बॉयफ्रेंड नाथन करमचंदानीशी लग्नगाठ बांधली आहे.
-
क्रिसन आणि नाथन करमचंदानी गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत होते.
-
दोघांनी हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं आहे.
-
त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
नाथनने गेल्या वर्षी अभिनेत्रीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं.
-
मग दोघांनी एप्रिल २०२३ मध्ये एंगेजमेंट केली होती.
-
त्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये त्यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं.
-
आता दोघांनी पारंपरिक हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलंय.
-
नाथन व क्रिसन यांच्या लग्नातील फोटोंची जोरदार चर्चा आहे.
-
तिने २२ एप्रिलला ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं.
-
लग्नात पांढऱ्या वेडिंग गाऊनमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
-
तर, नाथनने या खास दिवसासाठी काळ्या रंगाचा सूट निवडला होता.
-
क्रिसनला लग्नाच्या गाऊनमध्ये पाहून नाथन भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
-
हिंदू पद्धतीने दोघांनी लग्न केलं. लग्नात क्रिसनने लाल लेहेंगा निवडला होता, तर पांढऱ्या शेरवानीत नाथन छान दिसत होता.
-
नाथन करमचंदानी हा इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे, तो यूकेमध्ये राहतो.
-
क्रिसन व नाथन यांना चाहते सहजीवनासाठी शुभेच्छा देत आहेत.
-
(फोटो – FOURFOLD PICTURES वरून साभार)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल