-
अभिनेत्री रेखा व अभिनेते अमिताभ बच्चन एकेकाळी नात्यात होते. दोघांच्या लव्ह स्टोरीची खूप चर्चा झाली होती.
-
या दोघांच्या लव्ह स्टोरीशी संबंधित अनेक किस्से अजुनही चर्चेत असतात.
-
एका मुलाखतीत रेखा यांना अमिताभ यांच्याबद्दल थेट प्रश्न विचारण्यात आला होता.
-
‘Rendevouz with Simi Garewal’ या खास चॅट शोमध्ये सिमी यांनी रेखा यांना थेट अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? असा प्रश्न केला होता.
-
या प्रश्नाचं रेखा यांनी उत्तर दिलं होतं.
-
“अर्थात, आजपर्यंत मला एकही पुरुष, स्त्री, लहान मूल किंवा वृद्ध माणूस सापडला नाही जो त्यांच्यावर वेड्यासारखं प्रेम करत नाही, मग माझं प्रेम कसं नसेल?” असं रेखा म्हणाल्या होत्या.
-
त्यावेळी सिमी असं रेखा यांना थेट कसं विचारू शकतात? अशी टीकाही त्यांच्यावर झाली होती.
-
अमिताभ यांनी त्यांच्या आणि रेखामधील नात्याबद्दल उघडपणे कधीच भाष्य केलं नव्हतं.
-
(सर्व फोटो – फिल्मीज्ञानवरून साभार)
मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळं बेळगावमध्ये वाहकाला मारहाण; महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद