-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रत्येक विनोदवीर आता घराघरात पोहोचला आहे. प्रत्येकाने प्रेक्षकांच्या मनात आपल्या विनोद शैलीमुळे वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
-
ज्याप्रमाणे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे चाहते आहेत, त्याप्रमाणे या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीराचा सुद्धा एक वेगळा चाहतावर्ग आहे.
-
पण, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्री चेतना भटचे पती कोण आहेत, माहितीये का?
-
अभिनेत्री चेतना भटच्या पतीचं नाव मंदार चोळकर आहे; जे मराठी, हिंदी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आहेत
-
गेल्या कित्येक वर्षांपासून मंदार चोळकर मालिका, नाटक, चित्रपटासाठी गाणी लिहित आहेत.
-
अलीकडे प्रदर्शित झालेल्या मराठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटातील ‘वंदे मातरम्’ हे गाणं त्यांनी लिहिलं होतं.
-
‘दुनियादारी’, ‘क्लासमेट’, ‘मितवा’, ‘ओले आले’, ‘एकदा येऊन तर बघा’, ‘मुसाफिरा’, ‘लंडन मिसळ’, ‘लग्नकल्लोळ’, ‘ही अनोखी गाठ’, ‘फुलराणी’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘दगडी चाळ’, ‘फ्रेंडस’, ‘दे धक्का २’ अशा बऱ्याच मराठी चित्रपटातील गाणी त्यांनी लिहिली असून ती गाणी हिट देखील झाली आहेत.
-
सध्या रंगभूमीवर सुरू असलेलं ‘चाणक्य’ या नाटकातील गीते सुद्धा मंदार यांनी लिहिली आहेत.
-
‘प्रेम हे’, ‘बॉस माझी लाडाची’, ‘शेतकरीच नवरा हवा’, ‘जाऊ बाई गावात’, ‘निवेदिता माझी ताई’ अशा अनेक कार्यक्रम आणि मराठी मालिकांचं शीर्षकगीत मंदार चोळकरांनी लिहिलं आहे.
-
एवढंच नव्हे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नवीन गाणं ‘नवनिर्माण घडवूया’ हे देखील चेतना भटच्या पतीनं लिहिलं होतं.
-
तसंच ‘सीता रामम्’च्या हिंदी रिमेकमधील ‘दिल से दिल’, ‘जाने किस मोड पे’ ही गाणी सुद्धा मंदार यांनी लिहिली आहेत. (सर्व फोटो सौजन्य – चेतना भट इन्स्टाग्राम आणि मंदार चोळकर इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”