-
‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित होऊन आज आठ वर्षे झाली आहे.
-
‘सैराट’ हा मराठीतील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे.
-
आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं.
-
हा चित्रपट फक्त मराठीच नाही तर इतर भाषिक प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता.
-
ऑनर किलिंगसारख्या विषयावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं होतं.
-
सैराटमध्ये रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
-
रिंकू राजगुरूने या चित्रपटाला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त खास फोटो शेअर केले आहेत.
-
अवघ्या चार कोटींचं बजेच असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.
-
‘सैराट’ चित्रपटाने भारतात १०४ कोटी रुपये कमावले होते.
-
जगभरात या चित्रपटाने ११० कोटी रुपयांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं.
-
या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या आकाश व रिंकू यांनाही खूप लोकप्रियता मिळाली.
-
हा चित्रपट सुपरहिट झाल्यावर याचा हिंदीतही रिमेक बनविण्यात आला होता.
-
‘धडक’ नावाच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवी कपूर व ईशान खट्टर यांच्या मुख्य भूमिका होत्या.
-
या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
-
(फोटो – रिंकू राजगुरू व नागराज मंजुळे इन्स्टाग्राम)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड