-
‘पुढचं पाऊल’, ‘ठरलं तर मग’ अशा मराठी मालिकांमधून अभिनेत्री जुई गडकरी घराघरांत पोहोचली.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरीचं सायली पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलंय.
-
जुई गडकरीला टॅटू आवडत असल्याने तिच्या हातावर आणि पाठीवर अनेक टॅटू आहेत.
-
पण ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील सायली या व्यक्तिरेखेसाठी जुईला हे टॅटू लपवावे लागतात.
-
जुईने याबाबत तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरीदेखील शेअर केली होती. ज्यात मेकअपच्या साह्याने जुईचे टॅटू लपवले जात होते.
-
जुईच्या टॅटूबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्रीच्या पाठीवर मोरपीस असलेला एक टॅटू आहे.
-
तर जुईच्या हातावर बुलेटप्रूफ नावाचा एक टॅटू आहे.
-
याचा टॅटूचा अर्थ सांगताना जुई म्हणाली होती, एक स्त्री कशी बुलेटप्रूफ असते. कोणीही तिला कितीही त्रास दिला तरी ती तितकीच मजबूत असते, तशीच मी आहे. मी बुलेटप्रूफ आहे.
-
जुईच्या दुसऱ्या हातावर बेबी एंजलचा टॅटू आहे आणि त्याच टॅटूला जोडून मांजरीचे पाय आहेत. आईची तिच्या बाळांसाठीची काळजी दाखविणारा हा टॅटू आहे. (All Photos- juigadkariofficial/Instagram)
Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित