-
महानायक अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती हा शो होस्ट करतात.
-
या शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये बिग बींचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळतो.
-
प्रत्येक एपिसोडमध्ये त्यांच्या सूट व स्कार्फमध्ये ते खूप छान दिसतात.
-
पण प्रत्येक वेळी अमिताभ यांना तयार कोण करतं हे तुम्हाला माहीत आहे का? तेच जाणून घेऊयात.
-
बिग बींच्या सर्व लूकचे संपूर्ण श्रेय त्यांची स्टायलिस्ट प्रिया पाटील हिला जातं.
-
बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध स्टायलिस्ट प्रिया पाटील ही अमिताभ बच्चन यांचा शोमधील लूक ठरवते.
-
फक्त शोपुरतेच नाही तर त्यांचे इतर कार्यक्रमातील लूकही प्रिया ठरवते.
-
सूट असो व हूडी, बिग बी प्रत्येक लूकमध्ये हँडसम दिसतात.
-
या त्यांच्या वेगवेगळ्या लूकमागे प्रिया पाटीलचा हात असतो.
-
अमिताभ बच्चन यांच्या स्टाइलचे चाहते असणाऱ्यांनी प्रिया पाटीलचं इन्स्टाग्राम पाहिल्यास तिथे बिग बींचे सुंदर फोटो पाहायला मिळतील.
-
मुंबईतील रहिवासी असलेल्या प्रियाने भारत आणि यूकेमध्ये शिक्षण घेतलं आहे. यासोबतच तिने न्यूयॉर्क आणि इतर देशांमध्येही काम केलं आहे.
-
प्रिया अमिताभ बच्चन यांच्याबरोबर मागील ८-९ वर्षांपासून काम करत आहे.
-
‘अमिताभ लिजेंड आहेत, त्यांना कोणत्याही स्टायलिस्टची गरज नाही,’ असं प्रियाला वाटतं.
-
अमिताभ बच्चन यांच्याशिवाय प्रिया इतरही सेलिब्रिटींचे लूक डिझाईन करते.
-
(सर्व फोटो – प्रिया पाटील इन्स्टाग्राम)

Marathi Language Controversy : “मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुंबईत एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची मुजोरी, मनसेने ‘असा’ शिकवला धडा