-
परेश मोकाशी दिग्दर्शित बहुप्रतीक्षित ‘नाच गं घुमा’ चित्रपट बुधवारी, १ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात मुक्ता बर्वेसह नम्रता संभेराव, बालकलाकार वायकुळ, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत अशी तगडी कलाकार मंडळी आहेत.
-
‘नाच गं घुमा’ या चित्रपटाचं लेखन मधुगंधा कुलकर्णी यांनी केले आहे.
-
या चित्रपटाची निर्मिती परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी, तृप्ती पाटील, शर्मिष्ठा राऊत आणि तिचा पती तेजस देसाई यांनी केली आहे.
-
घराघरातील गृहिणी आणि त्यांच्याकडे कामाला येणारी मदतनीस यांच्यातील जिवाभावाच्या नात्याची गंमत उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
-
सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २.५० कोटी रुपये कमावले आहेत.
-
या चित्रपटाचं शीर्षक गीत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नाच गं घुमा/इन्स्टाग्राम पेज)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास