-
स्टार प्रवाह वाहिनीवर २७ मे पासून ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवी मालिका सुरु आहे.
-
राया आणि मंजिरी या मालिकेतली प्रमुख पात्र आहेत.
-
एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे येड लागलं प्रेमाचं ही मालिका.
-
मालिकेत बैलगाडा शर्यतीचा एक सीन पाहायला मिळणार आहे.
-
मंजिरीला बैलगाडा शर्यतीत भाग घ्यावा लागतो.
-
ही स्पर्धा ती जिंकते का याची उत्सुकता असेल.
-
या सीनचं शूट पंढरपुरात करण्यात आलं.
-
अभिनेत्री पूजा बिरारीने शूटिंगच्या अनुभवाविषयी सांगितलं.
-
बैलगाडा शर्यत शूट करायची असं ठरल्यापासून मनात खूप उत्सुकता होती.
-
मी कधीच बैलगाडी चालवली नाहीय. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव घेण्याची खुपच उत्सुकता होती.
-
पंढरपुरात आम्ही ही बैलगाडा शर्यत शूट केली.
-
जवळपास ४ ते ६ दिवस या खास भागाचं शूट सुरु होतं.
-
सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत आम्ही याच सीनवर मेहनत घेत होतो.
-
मात्र टीममधल्या कुणाच्याही चेहऱ्यावर थकल्याचे भाव नव्हते.
-
सीन अधिकाधिक चांगला कसा होईल याकडेच सर्वांचं लक्ष होतं.
-
बैलगाडी चालवणं हे मोठं आव्हान तर होतंच पण त्यासोबतच बैलांबरोबर जुळवून घेणं म्हणजे तारेवरची कसरत होती.
-
बैलगाडी नुसती चालवायची नव्हती तर ती शर्यतीत पळवायची होती.
-
त्यामुळे खूप काळजी घेऊन शूट करावं लागत होतं.
-
आमच्या टीमने सर्वांचीच उत्तम सोय केली होती.
-
दिग्दर्शकाबरोबरच बैलांच्या खऱ्या मालकांनी देखिल मला बैलगाडी चालवण्याचे धडे दिले.
-
मी हा सीन बॉडी डबलची मदत न घेता केला.
-
शूटिंगच्या दिवशी सगळे गावकरी हा सीन पहाण्यासाठी जमले होते.
-
खरतर खूपवेळा रिटेक्स झाले. मात्र आम्ही सर्वांनी हा सीन हताश न होता पूर्ण केला.
-
मालिकेतला राया म्हणजेच अभिनेता विशाल निकमने या सीनसाठी मला खूप मदत केली.
-
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बैलांबरोबर मी हा सीन शूट केला त्यांनी मला खूप सहकार्य केलं. त्यांची मी नेहमी ऋणी असेन.
-
माझ्यासाठी हा अतिशय विलक्षण आणि अविस्मरणीय अनुभव होता.
-
हा अनुभव माझ्या आठवणींच्या शिदोरीत कायम असेल.
-
हा सीन स्क्रीनवर कसा दिसणार हे पहाण्यासाठी मी उत्सुक आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा बिरारी/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”