-
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा बॉलीवूडमधील असा चित्रपट आहे जो इतक्या वर्षानंतरही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
-
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा आणि याच्या फ्रँचायझीमधील इतर चित्रपट तुफान गाजले. या चित्रपटांमुळेच संजय दत्तला बॉलीवूडमध्ये पुनरागमन करता आले.
-
या चित्रपटांमधून विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालण्याचे काम करण्यात आले. इतकंच नाही तर या चित्रपटातील अनेक पात्र अजरामर झाली आहेत.
-
अभिनेता संजय दत्त आणि अरशद वारसी यांनी या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. मात्र, हे दोघेही या चित्रपटसाठीची पहिली पसंती नव्हते.
-
संजय दत्त आणि अरशद वारसी यांच्या आधी इतर दोन कलाकारांचा ‘मुन्नाभाई’ आणि ‘सर्किट’ या पात्रांसाठी विचार करण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव ते कलाकार या भूमिका पार पाडू शकले नाहीत.
-
मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार मकरंद देशपांडे यांना ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगान’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. मात्र त्यांनी ही ऑफर नाकारली.
-
नुकत्याच झालेल्या मुलाखतीत मकरंद देशपांडे यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले की, दीर्घकालीन वचनबद्धतेच्या कारणामुळे त्यांनी हे चित्रपट नाकारले.
-
याचबरोबर त्यांनी सांगितले की ‘मुन्नाभाई एमबीबीएस’साठीची पहिली पसंत शाहरुख खान होता.
-
मकरंद देशपांडे म्हणाले की, ‘राजकुमार हिरानी यांनी मला बोलावले. मला काही सीन्सवर काम करायला सांगितले. यावर मी काही सुधारही सुचवले असावेत. आम्ही एक गाणेही रेकॉर्ड केले, ज्यात माझा आवाज होता.’
-
‘सुरुवातीला या चित्रपटात शाहरुख खान काम करणार होता. मात्र खांद्याच्या दुखापतीमुळे तो हा चित्रपट करू शकला नाही. यानंतर संजय दत्तची निवड करण्यात आली.’
-
मकरंद यांनी चित्रपट नाकारण्याचे कारण सांगितले, “मला नेहमीच भीती असायची की निर्माते मला तारखा कधी देणार. राजू यांनी माझ्याकडे ५६ दिवस मागितले. माझ्या बाजूने हे अतिशय चुकीचे होते. त्यावेळी मी एक चित्रपट तयार करण्याच्या विचारात होतो.”
-
“मला आधीपासूनच हे माहीत आहे की माझ्यासाठी माझ्या वेळेपेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. कोण मला कोणती बूमईक ऑफर करत आहे, ही भूमिका माझ्या करियरच्यादृष्टीने किती फायदेशीर आहे याबाबत मी कधीही विचार केला नाही कारण पैसा आणि प्रसिद्धी माझ्यासाठी तितकी महत्त्वाची नाही.”
-
मकरंद यांनी ‘लगान’ हा चित्रपट नाकारण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले, “आशुतोष गोवारीकरने या चित्रपटासाठी माझ्याकडे सहा महीने मागितले. तेव्हा मी त्याला म्हटले की मी सहा महीने देऊ शकत नाही.”
-
“आमीर खाननेही मला फोन केला आणि म्हणाला, ‘तुम्ही हा चित्रपट कसं नाकारू शकता. हा माझ्या प्रॉडक्शनचा पहिलाच चित्रपट आहे. हा चित्रपट क्रिकेटवर आधारित आहे आणि तुम्ही स्वतः एक क्रिकेटर असून हा चित्रपट नाकारत आहात.’ तेव्हा मी त्याला म्हटले, की मी हा चित्रपट नाकारत नाही आहे. पण मी सहा महीने देऊ शकत नाही.”
-
सर्व फोटो : सोशल मीडिया
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच