-
बॉलीवूडमध्ये अनेकदा स्टार्सच्या अफेअर्सच्या चर्चा रंगताना आपण पाहतो. मात्र असेही काही बॉलीवूड सेलिब्रिटी आहेत जे पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या प्रेमात पडले होते.
-
आज आपण अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेऊया ज्यांचे नाव पाकिस्तानी सेलिब्रिटींबरोबर जोडले गेले आहे.
-
९० च्या दशकात सलमान खान आणि पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अली एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक बातम्या आल्या होत्या. सोमी अलीने सलमान खानसोबत ‘बुलंद’ चित्रपटात काम केले होते. दरम्यान या दोघांनीही याबाबत कोणतीही पुष्टी केली नाही.
-
पाकिस्तानी अभिनेता अली जफरने कतरिना कैफसोबत ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ या हिंदी चित्रपटात काम केले होते. त्यानंतर या दोघांमध्ये अफेअर असल्याची बातमी समोर आली होती.
-
माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचे नाव पाकिस्तानी खेळाडू वसीम अक्रमसोबत जोडले गेले आहे. सध्या सुष्मिता रोहमन शॉलला डेट करत असल्याची बातमी आहे.
-
‘रईस’ फेम पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांचीही नावे एकमेकांशी जोडली गेली आहेत. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते.
-
मावरा होकेने ‘सनम तेरी कसम’ या बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. या अभिनेत्रीचे नाव सूरज पांचोलीसोबत जोडले गेले आहे.
-
एकेकाळी दिया मिर्झा आणि पाकिस्तानी गायक अली हैदर यांच्या अफेअरच्या बातम्या खूप गाजत होत्या. दिया मिर्झाने नंतर साहिल संघाशी लग्न केले असले तरी २०१९ मध्येच त्यांचा घटस्फोट झाला. आता दिया वैभव रेखीसोबत आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे.
-
बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री रेखाचे नाव पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी जोडले गेले होते. त्यावेळी इम्रान खान यांना रेखा खूप आवडायची.

Reliance Shares : एका माणसाला रिलायन्सचे ३७ वर्षांपूर्वीचे ३० शेअर्स घरी सापडले, पोस्ट करताच लोकांनी सांगितलं आजचं मूल्य