-
ड्रीमगर्ल हेमा मालिनी व धर्मेंद्र यांच्या लग्नाला ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत.(फोटो – हेमा मालिनी इन्स्टाग्राम)
-
दोघांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. (फोटो – हेमा मालिनी इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये अभिनेते धर्मेंद्र यांच्याशी लग्न केलं. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
धर्मेंद्र यांचे हे दुसरे लग्न होते. त्यांचे पहिले लग्न १९५४ मध्ये वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी झाले होते. (फोटो – हेमा मालिनी इन्स्टाग्राम)
-
चित्रपटसृष्टीत आल्यानंतर धर्मेंद्र यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. नंतर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यात प्रेम झालं व दोघांनी लग्न केलं.
(फोटो – हेमा मालिनी इन्स्टाग्राम) -
महत्वाचं म्हणजे धर्मेंद्र यांनी आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले होते. (फोटो – हेमा मालिनी इन्स्टाग्राम)
-
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र या दोघांच्या वयात सुमारे १३ वर्षांचे अंतर आहे.(फोटो – हेमा मालिनी इन्स्टाग्राम)
-
धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर या लग्नामुळे खूप नाराज होत्या. (फोटो – हेमा मालिनी इन्स्टाग्राम)
-
हेमा मालिनी यांच्या जागी आपण असतो तर असं कधीच केलं नसतं, असं या लग्नानंतर प्रकाश कौर म्हणाल्या होत्या.(फोटो – हेमा मालिनी इन्स्टाग्राम)
-
विशेष गोष्ट म्हणजे लग्नाला ४४ वर्षे उलटूनही हेमा मालिनी यांनी सासरचे तोंड पाहिले नाही. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
हेमा मालिनी मुंबईत राहतात तिथून १० मिनिटांच्या अंतरावर त्यांचे सासर आहे. मात्र, त्या आजपर्यंत कधीच तिथे गेल्या नाहीत.(फोटो – हेमा मालिनी इन्स्टाग्राम)
-
त्यामागचं कारण म्हणजे धर्मेंद्र आणि हेमा यांच्या लग्नाआधीच हेमा मालिनींनी आपल्या पतीच्या पहिल्या कुटुंबापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
हेमांच्या म्हणण्यानुसार, त्यांना धर्मेंद्रची पहिली पत्नी आणि त्यांच्या मुलांसाठी कोणतीही अडचण व्हायचं नव्हतं. तसेच त्यांच्या आयुष्यात त्यांना कोणताही हस्तक्षेप नको होता. (फोटो – हेमा मालिनी इन्स्टाग्राम)
-
यामुळे त्या कधीच सासरी गेल्या नाहीत. (फोटो – हेमा मालिनी इन्स्टाग्राम)
-
त्यांचं धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलांशी म्हणजेच सनी देओल व बॉबी देओलशी चांगलं नातं आहे. (फोटो – हेमा मालिनी इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”