-
प्रसिद्ध मल्याळम अभिनेते जयाराम यांची मुलगी मालविकाचं लग्न झालं आहे.
-
मालविकाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
मालविकाने ब्रिटनमधील चार्टर्ड अकाउंटंट नवनीत गिरीशशी लग्नगाठ बांधली आहे.
-
केरळमधील गुरुवायुर मंदिरात मालविका व नवनीतचं लग्न झालं.
-
३२ वर्षांपूर्वी जयाराम व त्यांची पत्नी पार्वती यांनी याच मंदिरात लग्न केलं होतं.
-
याच मंदिरात पारंपरिक मल्याळम पद्धतीने मालविका व नवनीतचं लग्न झालं.
-
या जोडप्याच्या लग्नात दोन्ही कुटुंबातील जवळचे लोक उपस्थित होते.
-
लग्नात मालविकाने लाल रंगाची साडी नेसली होती, तर नवनीतने पारंपरिक कपडे परिधान केले होते.
-
या जोडप्याच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
मालविका व नवनीतच्या लग्नाला भाजपा नेते सुरेश गोपी यांनी हजेरी लावली होती.
-
२८ वर्षांची मालविका ही जयाराम यांची धाकटी लेक आहे.
-
वेल्समधून स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेल्या मालविकाला मॉडेलिंगची आवड आहे.
-
मालविका आणि नवनीत यांची गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एंगेजमेंट झाली होती.
-
मालविका व नवनीतची एंगेजमेंट ख्रिश्चन पद्धतीने झाली होती.
-
एंगेजमेंटनंतर या जोडप्याने सुंदर फोटो शेअर केले होते.
-
नवविवाहित मालविका व नवनीत यांच्यावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
-
या लग्नातील जयाराम यांचे फॅमिली फोटो चर्चेत आहेत.
-
(सर्व फोटो – मालविका व व्हाइटलाइन फोटोग्राफी इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”