-
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं.
-
या मालिकेमुळे अभिनेत्री गायत्री दातार घराघरांत लोकप्रिय झाली होती.
-
यामध्ये गायत्रीने इशा ही भूमिका साकारली होती.
-
‘तुला पाहते रे’ नंतर आता पुन्हा एकदा गायत्री छोट्या पडद्यावर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
-
कलर्स मराठीवर येत्या काळात एका पाठोपाठ एक नव्या मालिका सुरू होणार आहे.
-
कलर्स मराठी वाहिनीवरील नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे.
-
प्रेक्षकांची लाडकी गायत्री दातार ‘अबीर गुलाल’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
गायत्रीच्या जोडीला या मालिकेत ‘बापल्योक’ फेम अभिनेत्री पायल जाधव देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
-
मराठी कलाविश्वातील कलाकारांसह गायत्रीच्या चाहत्यांनी तिला पुनरागमनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : गायत्री दातार व कलर्स मराठी वाहिनी इन्स्टाग्राम )

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल