-
परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरीही करत आहे.
-
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी १ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात मुक्ता बर्वेसह नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, सुप्रिया पाठारे, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, मायरा वायकूळ, सुनील अभ्यंकर यांच्या भूमिका आहेत.
-
या चित्रपटाने महाराष्ट्रात पहिल्याच दिवशी २.१३ कोटींचा व्यवसाय करत एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
-
हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता पाच दिवस झाले आहेत.
-
सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाने पाच दिवसात देशभरात ७.८० कोटी रुपये कमावले आहेत.
-
ही अंदाजे आकडेवारी असून अधिकृत आकडेवारी आल्यास त्यात थोडा फरक असू शकतो.
-
या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
-
मकर संक्रातीच्या दिवशी या चित्रपटाची घोषणा परेश मोकाशी यांनी केली होती.
-
स्वप्नील जोशी, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, परेश मोकाशी, तृप्ती पाटील यांनी या चित्रपटाती निर्मिती केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नाच गं घुमा/इन्स्टाग्राम)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”