-
९०व्या काळापासून ते आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट देत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजेच रवीना टंडन.
-
रवीना टंडनने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरुन भीमाशंकर मंदिरातील आपल्या मुलीबरोबरचे काही खास फोटोज शेअर केले आहेत.
-
भीमाशंकर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे.
-
हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “महादेव महाराज की जय…”
-
रवीना टंडन गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलीसोबत तीर्थयात्रा करत आहे. यापूर्वी, अभिनेत्रीने उज्जैनचे महाकाल, काशी विश्वनाथ (वाराणसी, उत्तर प्रदेश), नाशिकचे त्र्यंबकेश्वर या मंदिरांना भेट दिली होती.
-
या माय लेकीने गुजरातचे सोमनाथ मंदिर, बद्रीनाथ (उत्तराखंड) या मंदिरांमध्येदेखील दर्शन घेतले होते.
-
रवीना टंडनचा ‘पटना शुक्ला’ चित्रपट नुकताच डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला.
-
रवीनाची ‘कर्मा कॉलिंग’ ही वेब सीरिजसुद्धा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी चॅनलवर सुरू आहे. (All photos- officialraveenatandon/Instagram)
