-
‘पंचायत’ वेब सीरिजच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
ज्येष्ठ अभिनेते रघुबीर यादव आणि जितेंद्र कुमार यांच्या ‘पंचायत’ या वेबसिरीजचे दोन सीझन आले आहेत. प्रेक्षक तिसऱ्या सीझनची वाट पाहत होते, आता त्याच्या रिलीजची तारीख जवळ आली आहे.
-
२८ मे रोजी तुम्ही ‘पंचायत ३’ प्राइम व्हिडीओवर पाहू शकाल.
-
ही वेब सिरीज २८ मे रोजी Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे. पण केवळ प्राइम व्हिडिओचं सबस्क्रिप्शन असलेलेच ही सीरिज पाहू शकतात असं अजिबात नाही.
-
जरी ही सीरिज प्राइम व्हिडीओवर येत असली तरी इतर लोक देखील ती सहज व फ्री पाहू शकतात.
-
रिलायन्स जिओ आणि एअरटेल सिम असलेले लोक ही सीरिज फ्री पाहू शकतात.
-
या दोन्ही सिममध्ये असे अनेक रिचार्ज प्लॅन येत आहेत, ज्यामध्ये प्राइम व्हिडिओ सबस्क्रिप्शनही मिळतं. हे प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला प्राइमचे वेगळे सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही.
-
हे रिचार्ज प्लॅन घेतल्यानंतर तुम्ही ‘पंचायत ३’ पाहू शकता.
-
‘पंचायत २’ ची कथा जिथे संपली होती, तिथूनच तिसरा भाग सुरू होईल. पण यावेळी सीरिजमध्ये अशा अनेक घटना पाहायला मिळणार आहेत, ज्यांचा सामना फुलेरा गावाला होणार आहे. (सर्व फोटो – सीरिजमधील स्क्रीनशॉट)
-
याशिवाय यावेळी सचिवजींची लव्हस्टोरीही सुरू होणार आहे. (फोटो – जितेंद्र कुमार इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”