-
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिच्या फॅशनेबल पेहरावामुळे चर्चेत असते.
-
अनेकदा ती सोशल मीडियावर वेगवेगळ्या फोटोशूटमधील फोटो शेअर करत असते.
-
नुकतंच आलियाने ‘मेट गाला २०२४’ कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
यासाठी तिने खूपच सुंदर पेहराव केला होता.
-
मेट गाला २०२४ मध्ये, आलिया भट्टने सब्यसाचीने डिझाइन केलेली मिंट ग्रीन कलरची साडी परिधान करून रॅम्प वॉक केला.
-
आलियाने स्टेटमेंट ज्वेलरी आणि क्लासिक हेअरस्टाइल करून तिचा लूक पूर्ण केला आहे. आलियाच्या देसी लूकने सर्वांचे लक्ष वेधून असून तिच्या पारंपारिक लूकची जगभरात चर्चा होत आहे.
-
आलिया भट्टची ही साडी तयार करण्यासाठी तब्बल १९६५ तास लागले असून १६३ कारागिरांनी ही साडी तयार करण्यासाठी विशेष मेहनत केली आहे.
-
फ्लोरल मोटीफ वर्क साडीला आणखी सुंदर बनवत आहे. साडीला एक लांब ट्रेल जोडलेला आहे, जो आलियाच्या लूकमध्ये भर घालत आहे.
-
मेट गाला 2024 मधील आलिया भट्टच्या लूकचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले आहेत. (All Photos: Alia Bhatt/Instagram)

Zapuk Zupuk: सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख