-
६ मे २०२४ रोजी न्यू यॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये मेट गालाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात आलिया भट्ट, ईशा अंबानीसह अनेक भारतीय उद्योजिकांनी हजेरी लावली होती.
-
२०२३ नंतर अभिनेत्री आलिया भट्टने हटके अंदाजात मेट गालाच्या रेड कार्पेटवर एन्ट्री मारली आहे. यावर्षीच्या मेट गालासाठी अभिनेत्रीने ‘सब्यसाची’ची डिझायनर फ्लोरल साडी परिधान केली होती.
-
ईशा अंबानीने राहुल मिश्रा यांचा डिझायनर साडी गाऊन परिधान केला होता. फुलपाखरू आणि फुलांनी सजवलेल्या या गाऊनला बनवायला तब्बल १०,००० तास लागले.
-
अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका जेंडयाने (Zendaya) निळ्या आणि हिरव्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. तिचा पोशाख मोराच्या रंगासारखा होता. अभिनेत्रीने डोक्यावर मोठे मोराचे पीस लावले होते.
-
उद्योजिका नताशा पूनावालाने डिझायनर जॉन गॅलियानोशी कोलॅब करून काळ्या आणि सफेद रंगाचा अबस्ट्रॅक्ट गाऊन परिधान केला होता. या लूकसाठी तिने मॅचिंग मोठी हॅटदेखील घातली होती.
-
सुप्रसिद्ध अमेरिकन रॅपर कार्डी बीने (Cardi B) काळ्या रंगाचा ट्यूल गाऊन परिधान केला होता.
-
व्यावसायिका मोना पटेल हिने लेयर्ड फ्लोरल गाऊन परिधान केला होता.
-
सुप्रसिद्ध किम कार्देशियन (Kim Kardashian) हिने सिल्वर रंगाचा कोरसेट ड्रेस परिधान केला होता.
-
अमेरिकन गायिका दोजा कॅटने (Doja Cat) चक्क भिजलेला पारदर्शक टी-शर्ट घातला होता. (All Photos- Social Media)
आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना