-
मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांना अभिनयासह राजकारणातही तितकाच रस आहे. हीच आवड जोपासत अनेक कलाकारांनी राजकारणात पाऊल ठेवले आहे.
-
अभिनेत्री कंगना रणौत, अरुण गोविल यांच्याच बरोबर आता ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुली आणि शेखर सुमन यांनीही राजकारणात प्रवेश केला आहे.
-
दरम्यान, या कलाकारांची संपत्ती कोट्यवधीच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. आज आपण अशाच काही कलाकारांच्या एकूण संपत्तीबाबत माहिती जाणून घेऊया.
-
‘रामायण’ फेम अभिनेते अरुण गोविल यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ते अतिशय विलासी जीवन जगतात.
-
असे सांगण्यात येते की अरुण यांच्याकडे ६२.९९ लाखांची मर्सिडीज कार असून त्यांची चल संपत्ती ३.१९ कोटी तर अचल संपत्ती ५.६७ कोटींच्या घरात आहे.
-
दीपिका चिखलिया यांच्या कारकिर्दीत ‘रामायण’ हा मैलाचा दगड ठरला. त्यावेळी दीपिका यांना रामायणमध्ये काम करण्यासाठी २० लाख रुपये मिळाले होते.
-
दीपिका यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला असून त्यांच्या नेट वर्थबद्दल बोलायचे झाले तर त्यांची एकूण संपत्ती ३८ कोटी रुपये इतकी आहे.
-
कंगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. कंगना राणौतची एकूण संपत्ती ९५ कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी ती जवळपास १५ ते २० कोटी रुपये मानधन घेते.
-
‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीची एकूण संपत्ती जवळपास २५ कोटी रुपये आहे. ती प्रत्येक एपिसोडसाठी तीन लाख रुपये घेत असल्याच्या बातम्या आहेत.
-
गुल पनागलाही राजकारणाची आवड असून २०१४ मध्ये तिने आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. तिची एकूण संपत्ती ५ ते ६ कोटी रुपये असल्याची माहिती आहे.
-
हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री काम्याने पंजाबीने काँग्रेसचे सदस्यत्व घेतले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती सुमारे १०-१२ कोटींच्या घरात आहे.
-
नुकतंच ‘हिरामंडी’ वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले अभिनेते शेखर सुमन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शेखर यांचा मुंबईत आलिशान बंगला असून ते अतिशय साधे आयुष्य जगतात. त्यांची एकूण संपत्ती जवळपास २० कोटी रुपये आहे.

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच