-
झी मराठी वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमातून अभिनेते आदेश बांदेकर घराघरात लोकप्रिय झाले.
-
काल, ७ मे रोजी आदेश यांचा लेक सोहमचा वाढदिवस होता.
-
सोहमच्या वाढदिवसानिमित्त आदेश यांनी सोशल मीडियावर त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर केले आहेत.
-
‘प्रिय सोहम वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा… अल्बम आठवणींचा’ असे कॅप्शन आदेश यांनी या फोटोंना दिले आहे.
-
सोहमच्या या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या कार्यक्रमातून सोहमने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
-
या मालिकेत सोहमने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.
-
सोहमने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
-
अभिनयाच्या जोरावर सोहमने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
सोहम सध्या आदेश व सुचित्रा यांचे ‘सोहम प्रोडक्शन हाऊस’ सांभाळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आदेश बांदेकर/इन्स्टाग्राम)
लोकांच्या जीवाशी खेळ! महिलांनो बाजारातून कोबी विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल