-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे चाहते आज महाराष्ट्रातच नव्हे तर समस्त जगभरात आहेत.
-
अभिनेता गौरव मोरेला हास्यजत्रेमुळे घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली.
-
आता गौरवने वैयक्तिक आयुष्यात एक मोठा निर्णय घेतला आहे.
-
इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत गौरवने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम सोडल्याचं जाहीर केलं आहे.
-
“आपण या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं, सन्मान दिलात त्याबद्दल मी आपला कायम ऋणी आहे” असं गौरवने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
अभिनेता पुढे म्हणाला, “मला सांगताना खूप वाईट वाटतंय की, मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून आपला निरोप घेत आहे.”
-
“माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर, मी त्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो.” अशी भावुक पोस्ट गौरवने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
-
हास्यजत्रा सोडल्यावर आता गौरव नवीन कोणती भूमिका साकारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
-
दरम्यान, यापुढे महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात गौरव मोरे दिसणार नाही म्हणून त्याचे चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : गौरव मोरे इन्स्टाग्राम )
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”