-
अभिनेत्री दीपिका पदुकोण व रणवीर सिंह बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहे.
-
लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका आणि रणवीर आई-बाबा होणार आहेत. २९ फेब्रुवारीला याबाबत दीपिका-रणवीरने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ देत एक खास पोस्ट शेअर केली होती.
-
मध्यंतरी दीपिकाने भरतकाम करतानाचा एक फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला होता.
-
गर्भवती असूनही आगामी चित्रपटासाठी ॲक्शन सीक्वेन्सचं शूटिंग करण्यासाठी दीपिका पोलिसांच्या गणवेशात सिंघम अगेनच्या सेटवर पोहोचली होती.
-
नुकतेच दीपिकाच्या बेबी बंपचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रणवीर आणि दीपिकाचा हा अनसीन फोटो रेडीटवर व्हायरल झाला होता.
-
मंगळवारी रणवीर सिंहने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून दीपिका आणि त्याचे लग्नाचे फोटो डिलीट केले किंवा लपवले आहेत, अशी चर्चा सुरू होती.
-
परंतु या चर्चांना पूर्णविराम देत दोघंही त्यांच्या वेकेशनवरून एकत्र परत आले आहेत. पापाराझींनी त्यांना एकत्र स्पॉट केलं.
-
दीपिकाच्या कामाबाबत सांगायचं झालं तर, दीपिका रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे.
-
तर रणवीर सिंह, ‘डॉन-३’ या चित्रपटात कियारा अडवाणीबरोबर दिसणार आहे. (All Photos- Social Media)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”