-
आमिर खान निर्मित ‘लापता लेडीज’ १ मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन यांसारखे कलाकार आहेत.
-
किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नसला तरीही ओटीटीवर येताच या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रेक्षकांनी या चित्रपटाला ‘बॉलिवूडचा उत्कृष्ट नमुना’ म्हटलं आहे.
-
दरम्यान, आता रवी किशन यांनी एका मुलाखतीत त्यांना या चित्रपटासाठी काय काय करावे लागले आहे याबाबत भाष्य केले आहे.
-
‘लापता लेडीज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आमिर खानची पूर्व पत्नी आणि दिग्दर्शक किरण रावने केले आहे. सध्या रवी किशनची या चित्रपटाच्या स्टारकास्टसोबतची एक मुलाखत व्हायरल होत आहे यामध्ये नितांशी गोयल, प्रतिभा रंता तसेच मुख्य अभिनेता स्पर्श श्रीवास्तवही उपस्थित आहेत.
-
रवी किशनने या चित्रपटात जो पैशासाठी कोणालाही तुरुंगात टाकू शकणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. सध्या रवी किशनच्या जबरदस्त अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-
दीपक रवी किशनकडे आपली बायको हरवली असल्याची रिपोर्ट लिहून घेण्यासाठी जातो, तो सीन शूट करताना रवी किशनला जवळपास ३२ पान खावे लागले होते. याचे कारण म्हणजे हा सीन अनेक दृष्टीकोनातून शूट करण्यात आला होता.
-
इतकंच नाही तर संपूर्ण चित्रपटादरम्यान त्यालला तब्बल १६० पान खावे लागले. खुद्द रवी किशनने ही माहिती दिली आहे.
-
या चित्रपटात रवीने पान चघळणाऱ्या आणि लाच घेणाऱ्या पोलिसाची भूमिका साकारली. त्याचे पात्र थोडे गडद होते.
-
विशेष म्हणजे आमिर खानलाही हे पात्र साकारण्यात रस होता आणि त्याने ऑडिशनही दिले होते. पण किरण रावने त्याला घेण्यास नकार दिला.

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार