-
२० वर्षीय ताजिकिस्तानी गायक आणि बिगबॉस १६ फेम अब्दू रोजिक सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ७ जुलै रोजी तो अमिराती मुलीशी लग्न करणार असल्याच्या सध्या सर्वत्र चर्चा आहेत.
-
‘बुर्गिर’ या व्हिडीओच्या माध्यमातून व्हायरल झालेल्या अब्दु रोजिकचा दुबईत शाही राजवाडा आहे. अब्दू ताजिकिस्तानमध्येही भव्य जीवन जगतो.
-
पण तुम्हाला माहित आहे का अब्दू लहानपणी एका छोट्या घरात राहत होता. अब्दुचे बालपण खूप कठीण गेले.
-
अब्दू रोजिकने सलमान खानच्या रिॲलिटी शो ‘बिग बॉस १६’ मध्ये सर्वांची मने जिंकली. या शोनंतर अब्दू भारतात प्रचंड लोकप्रिय झाला.
-
अब्दु रोजिकने बिग बॉसच्या घरात फार कमी वेळात लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले होते.
-
‘बिग बॉस 16’ पूर्वी, अब्दू रोजिकला भारतात कोणीही ओळखत नव्हते, पण आज अब्दू संपूर्ण देशाचा आवडता बनला आहे. तीन फूट उंचीच्या अब्दूने आपल्या क्यूटनेसने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.
-
नुकतेच अब्दूने सोशल मीडियावर जाहीर केले की तो ७ जुलै रोजी अमिराती मुलीशी लग्न करणार आहे.
-
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अब्दूने लिहिले, “मला कधीच वाटले नव्हते की कोणीतरी माझ्या आयुष्यात येईल. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला माझे प्रेम मिळाले आहे.”
-
‘बिग बॉस १६’ मधून प्रसिद्ध झालेला अब्दू वैयक्तिक आयुष्यात खूपच श्रीमंत आहे. 20 व्या वर्षी अब्दू रोजिक हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.
-
अब्दूचा दुबईत एक शाही राजवाडाही आहे. ताजिकिस्तानमध्येही तो विलासी जीवन जगतो. या वयात, अब्दू जवळपास दोन दशलक्ष डॉलर्सच्या मालमत्तेचा मालक आहे.
-
पण अब्दू नेहमीच इतका श्रीमंत नव्हता. ‘बिग बॉस १६’मध्ये साजिद खानसोबत बोलताना अब्दूने खुलासा केला होता की, त्याचे बालपण खूप कठीण गेले होते.
-
अब्दू रोजिकने खुलासा केला होता की लहानपणी तो एका छोट्या घरात राहत असे आणि या घरच्या छतावरून पाणी टपकत असे. अब्दूने असेही सांगितले की त्याला आजही खेळण्यांची खूप आवड आहे.
-
अब्दूचे मूळ गाव डोंगराळ भागात आहे. तिथे त्याला खूप छान वाटते. अब्दुचे एक यूट्यूब चॅनेल देखील आहे ज्यावर तो त्याच्या आयुष्याशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी शेअर करत असतो. (All Photos: Abdu Rozik/Instagram)
![Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes, Quotes in Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-18-at-11.58.10.jpeg?w=300&h=200&crop=1)
Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज