-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री झील मेहता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत आत्माराम भिडेंच्या लेकीची सोनू नावाची भूमिका साकारून झील खूप लोकप्रिय झाली.
-
झील लवकरच लग्न करणार असून ती इन्स्टाग्रामवर होणाऱ्या पतीबरोबरचे फोटो शेअर करत असते.
-
आता तिने होणारा पती आदित्य दुबेबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
-
आदित्य व झीलने बीचवर रोमँटिक फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोंमध्ये झील आदित्यला प्रपोज करताना दिसत आहे.
-
त्यांचे बीचवरील रोमँटिक फोटो सोशल मीडियावरही चर्चेत आहेत.
-
या खास फोटोशूटसाठी आदित्य व झीलने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.
-
बीचवर मस्ती करतानाचे फोटो झीलने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
आदित्य व झील यांचे प्री-वेडिंगचे हे फोटो आहेत.
-
प्री-वेडिंगचे हे फोटो पाहता ते लवकरच लग्न करतील, अशा चर्चा होत आहेत.
-
झील व आदित्य यांचा साखरपुडा झाला आहे.
-
झीलने जानेवारी महिन्यात साखरपुडा केला होता.
-
झीलच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती सध्या अभिनयापासून दूर असून बिझनेस सांभाळतेय.
-
(सर्व फोटो – झील मेहता इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख