-
हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री इशा मालविया ‘बिगबॉस १७’ मधून संपूर्ण देशात ओळखली जाऊ लागली.
-
या कार्यक्रमानंतर तिची लोकप्रिय आणखीनच वाढली असून तिने मालिकांसह अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले.
-
दरम्यान, इशा मालवियाने यंदाच्या ‘मदर्स डे’ला आईला सुखद धक्का दिला आहे. यामुळे तिची आई नक्कीच खुश झाली आहे.
-
इशा तिच्या आईच्या खूप जवळ आहे. ती अनेकदा त्यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत असते.
-
इशाने अनेकदा सांगितले आहे की तिच्या या यशामध्ये तिच्या आईचा मोठा वाटा आहे. अशातच तिने यंदाच्या ‘मदर्स डे’ला आईसाठी खास गोष्ट केली आहे.
-
यावेळी इशाने आपल्या आईला अतिशय महागडी वस्तू भेट केली आहे. ही किंमत ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.
-
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार इशाने तिच्या आईसाठी सॉलिटेयर रिंग घेतली आहे. यांची किंमत जवळपास अडीच लाख रुपये सांगण्यात येत आहे.
-
नुकतेच इशाचे ब्रेकअप झाले. तिच्या ब्रेकअपमुळे ती चर्चेत होती आणि तिच्या आईने तिला खूप सपोर्ट केल्याचे तिने सांगितले होते.
-
बिग बॉस १७ मधून बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच, इशा तिचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेलपासून वेगळी झाली. खुद्द समर्थ यांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.

साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की