-
संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमधील एक अभिनेत्री तिच्या अभिनयासाठी सातत्याने ट्रोल होत आहे.
-
मुख्य सहा अभिनेत्रींपैकी एक असलेल्या या अभिनेत्रीचं नाव शर्मीन सेगल आहे.
-
शर्मीन सेगल ही सीरिजचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळींची भाची आहे.
-
शर्मीन संजय यांची बहीण बेला सेगल यांची मुलगी आहे.
-
२८ सप्टेंबर १९९५ रोजी जन्मलेली शर्मीन २८ वर्षांची आहे.
-
तिचे वडील दीपक सेगल सध्या ऍप्लॉज एंटरटेनमेंट या आघाडीच्या प्रॉडक्शन हाऊसचे कंटेंट हेड आहेत.
-
तिची आई बेला फिल्म एडिटर आहे. त्यांनी खामोशी, देवदास आणि ब्लॅक सारख्या भन्साळींच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे.
-
शर्मीन सेगल विवाहित आहे. तिने सहा महिन्यांपूर्वी लग्न केलं.
-
शर्मीनने नोव्हेंबर २०२३ मध्ये एका भव्य समारंभात उद्योगपती अमन मेहताशी लग्न केलं.
-
अमन हा बिझनेस टायकून समीर मेहता यांचा मुलगा आहे.
-
समीर आणि त्यांचे भाऊ सुधीर मेहता टोरेंट ग्रुपचे प्रमुख आहेत.
-
मेहता ब्रदर्सचं साम्राज्य फार्मा, पॉवर, गॅस आणि डायग्नोस्टिक्स क्षेत्रात पसरलं आहे.
-
ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार, २०२४ पर्यंत समीर मेहता यांची एकूण संपत्ती तब्बल ६.४४ बिलियन डॉलर्स म्हणजे ५३,८०० कोटी रुपये आहे.
-
टोरेंट फार्मास्युटिकल्स ही मेहता ब्रदर्सची मुख्य कंपनी आहे.
-
फोर्ब्सनुसार ही कंपनी ३५ हजार कोटींचा महसूल जनरेट करते.
-
शर्मीनने वयाच्या १८ व्या वर्षी तिच्या मामांची असिस्टंट म्हणून गोलियों की रासलीला राम-लीलामध्ये काम केलं होतं.
-
शर्मीनने मेरी कॉम, बाजीराव मस्तानी आणि गंगूबाई काठियावाडी या तीन चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम केलं.
-
तिने २०१९ मध्ये आलेल्या ‘मलाल’ चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.
-
त्यानंतर ती २०२२ मध्ये रिलीज झालेल्या अतिथी भूतो भवमध्ये दिसली होती.
-
हीरामंडी ही तिची पहिली वेब सीरिज आहे.
-
(सर्व फोटो शर्मीन सेगल इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”