बॉलीवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयामुळे तब्बूने अनेकांचे मन जिंकलं आहे. तब्बू बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. कोरोना महामारीच्या लॉकडाऊननंतर तब्बूने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार चित्रपटांसह पुनरागमन केले.रिपोर्टसनुसार तब्बू १२ वर्षांनंतर पुन्हा हॉलिवूडमध्ये काम करणार आहे. तब्बूने यापूर्वी हॉलिवूडमध्ये ‘द नेमसेक’ आणि ‘लाइफ ऑफ पाय’ या चित्रपटांमध्ये ही काम केले आहे.लवकरच ऑस्कर विजेता फिल्म फ्रँचायझी ‘डून’चा प्रीक्वल येणार आहे आणि या वेब सीरिजसाठी बॉलीवूड अभिनेत्री तब्बूला कास्ट करण्यात आले आहे.तब्बू ‘डून’ या वेबसिरीजमध्ये सिस्टर ‘फ्रान्सिस्का’च्या भूमिकेत दिसणार आहे.२०१२ साली प्रदर्शित झालेला हॉलिवूड चित्रपट ‘लाइफ ऑफ पाय’ या चित्रपटात तब्बूसोबत आदिल हुसैन, इरफान खान, सूरज शर्माने ही कामं केले होते.
लॉकडाऊननंतर, बॉलीवूड अभिनेत्री तब्बूने बॉलीवूडमध्ये भूल भुलैय्या-२, दृष्य-२, भोला आणि क्रूमध्ये काम केले आहे. हे तिन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले.‘औरो में कहा दम था’ या आगामी चित्रपटात तब्बू अजय देवगणसोबत दिसणार आहेत. (Photos: Indian Express)