-
‘हास्य सम्राट’ या मराठी कॉमेडी शोची सूत्रसांचालक अभिनेत्री दीप्ती साधवानीने ७७व्या वार्षिक कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती.
-
दीप्ती साधवानी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेतदेखील झळकली होती.
-
दीप्ती साधवानीने या खास दिवशी नारंगी रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता.
-
मेसी हेअरस्टाईल, ग्लॅम मेकअप आणि मॅचिंग ज्वेलरीची निवड करत तिने हा लूक पूर्ण केला होता.
-
सोशल मीडियावर याचे फोटो शेअर करत दीप्तीने कॅप्शन दिल, “स्वप्नं सत्यात उतरतात आणि माझंही स्वप्नं सत्यात उतरलंय. लहानपणापासून मी नेहमी स्वप्नं पाहायची आणि शेवटी फ्रेंच रिव्हिएरा येथील ७७ व्या कॅन्स चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्याचं माझं हे स्वप्न पूर्ण झालं.”
-
‘नजर हटी दुर्घटना घटी’, ‘रॉक बॅंड पार्टी’ या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.
-
दीप्ती साधवानीने मिस नॉर्थ इंडियाचा किताब जिंकला होता आणि फेमिना मिस इंडियामध्येदेखील तिने भाग घेतला होता.
-
‘तू आग का गोला छोरी’, ‘बटरफ्लायवाले’ अशा अनेक म्यूझिक व्हिडीओमध्ये ती झळकली आहे.
-
मुंबईत इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून दीप्तीने आपल्या करिअरची सुरुवात केली, पण अभिनयाची आवड असल्याने तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.

डोनाल्ड ट्रम्प ९० दिवसांसाठी आयात शुल्कापासून दिलासा देणार? व्हाइट हाऊसचं स्पष्टीकरण…