-
दमदार अभिनयशैलीमुळे कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल होय.
-
आज विकी कौशलचा ३६ वा वाढदिवस आहे.
-
अप्रतिम अभिनेता अन् कतरिना कैफचा पती विकीवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
आज आपण विकी कौशलचं शिक्षण किती, याबद्दल जाणून घेणार आहोत.
-
१६ मे १९८८ रोजी मुंबईतील एका चाळीत विकीचा जन्म झाला.
-
विकीचे वडील श्याम कैशल त्यावेळी अॅक्शन डायरेक्ट होते. तर त्याची आई वीणा कौशल या गृहिणी होती.
-
बॉलिवूडपासून दूर राहून आपल्या मुलाचं करिअर स्टेबल असावं, असं त्याच्या वडिलांना वाटत होतं.
-
विकी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम्युनिकेशन इंजीनिअर असून त्याने २००९ साली मुंबईतील राजीव गांधी इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून ही पदवी संपादन केली आहे.
-
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने एका ठिकाणी नोकरीही केली. मात्र त्याच्यातील कलाकार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता.
-
विकीने अभिनेता व्हायचं ठरवलं. त्यासाठी त्याने किशोर नमित कपूरच्या अॅक्टिंग अकादमीमध्ये अभिनयाचं शिक्षण घेतलं.
-
तसेच तो मानव कौलच्या अरण्य ग्रुप आणि नसीरुद्दीन शाहच्या मोटली प्रॉडक्शन थिएटरमध्ये सहभागी झाला.
-
नंतर त्याने दोन वर्षे ऑडिशन्ससाठी घालवली होती, परंतु त्याला कोणतीही चांगली संधी मिळाली नाही.
-
विकीने ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये अनुराग कश्यपचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करून चित्रपटांमधील करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने कश्यपच्या ‘लव शव ते चिकन खुराना’, ‘बॉम्बे वेल्वेट’ आणि ‘गीक आउट’ यामध्ये लहान लहान भूमिका केल्या होत्या.
-
विकीने २०१५ मध्ये आलेल्या ‘मसान’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाची आणि त्याच्या अभिनयाची प्रचंड चर्चा झाली होती.
-
या चित्रपटानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. राजी, उरी: द सर्जिकल स्ट्राइक, उधम सिंह, संजू, सॅम बहादूर, जरा बचके जरा हटके अशा सिनेमांमध्ये काम केलं. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?