-
ऐश्वर्या राय बच्चन ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झाली. तिने गुरुवारी या प्रतिष्ठित कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर वॉक केला.
-
तिचा कानमधील ग्लॅमरस लूक समोर आला आहे. चाहते ऐश्वर्याच्या लूकचं, तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक करत आहेत.
-
ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे तिच्या उजव्या हातावर प्लास्टर होतं, पण तरीही अभिनेत्रीने आपल्या ग्लॅमरस अंदाजाने उपस्थितांना भुरळ पाडली.
-
ऐश्वर्याने फ्रान्सिस फोर्ड कोपोलाच्या ‘मेगालोपोलिस’ चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी गोल्डन टच असलेल्या ब्लॅक अँड व्हाइट आउटफिटमध्ये रेड कार्पेटवर वॉक केला.
-
फाल्गुनी शेन पीकॉकने हा ड्रेस डिझाइन केला होता. दुखापतग्रस्त ऐश्वर्याची या कार्यक्रमात लेक आराध्या काळजी घेताना दिसली.
-
२००२ पासून ऐश्वर्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये नियमित हजेरी लावत आहे. ती पहिल्यांदा शाहरुख खान आणि संजय लीला भन्साळी यांच्यासोबत ‘देवदास’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती.
-
गेल्या काही वर्षांत ऐश्वर्या लोरिअल या ब्रँडची अम्बॅसिडर म्हणून ‘कान’मध्ये रेड कार्पेटवर वॉक करत असते.
-
वर्षी फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याबरोबरच भारतीय अभिनेत्री कियारा अडवाणी, सोभिता धुलिपाला, अदिती राव हैदरी देखील सहभागी होणार आहेत.
-
(फोटो – एपी व ऐश्वर्या राय इन्स्टाग्राम)

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल