-
प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वातील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
स्टंटवर आधारित असलेला ‘खतरों के खिलाडी’चं १४वं पर्व लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे. तसंच निर्माते देखील या कार्यक्रमाच्या तयारीत आहेत.
-
अशातच ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वात झळकणाऱ्या स्पर्धकांची नाव जाहीर झाली आहेत. यामध्ये एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं देखील नाव आहे.
-
जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ रोहित शेट्टीच्या या लोकप्रिय कार्यक्रमात झळकणार आहे. ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वातून कृष्णा टेलिव्हिजनवर पदार्पण करत असल्याचं म्हटलं जात आहे. टायगरची बहीण फिटनेस फ्रीक आहे. त्यामुळे इतर कलाकारांसाठी ती तगडी स्पर्धक असणार आहे.
-
‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वात झळकणाऱ्या सदस्यांच्या यादीत ‘कपिल शर्मा शो’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचं नाव आहे.
-
विशेष म्हणजे यंदा ‘खतरों के खिलाडी’मध्ये प्रसिद्ध मराठी चेहरा झळकणार आहे. अभिनेता गश्मीर महाजनी ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वात पाहायला मिळणार आहे.
-
याशिवाय शालिन भनोट, आसिम रियाज, अभिषेक कुमार, नियाती फटनानी, करण वीर मेहरा, समर्थ जुरैल, आशीष मल्होत्रा आणि शिल्पा शिंदे ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वात दिसणार आहेत. पण यामधील सर्वाधिक मानधन ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वासाठी कोणी घेतलंय? जाणून घ्या…
-
सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांमध्ये पहिल्या नंबरवर आहे आसिम रियाज. ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वासाठी आसिमने एका आठवड्यासाठी १५ ते २० लाख रुपये मानधन घेतलं आहे.
-
सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांमध्ये दुसऱ्या नंबरवर शालिन भनोट असून त्याने एका आठवड्यासाठी १५ लाख मानधन घेतलं आहे. तसंच तिसऱ्या नंबरवर असलेल्या अभिषेक कुमारने ८ ते १० लाख रुपये मानधन एका आठवड्यासाठी घेतलं आहे.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल