-
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज ( २० मे ) महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
-
सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण मतदानाचा हक्क बजावत आहे.
-
लोकप्रिय मराठी कलाकारांनी मतदान केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री सुकन्या मोने यांनी मुंबईत मतदान केलं आहे. “माझं कर्तव्य बजावलं आता तुम्ही सुद्धा मतदान करा” असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे.
-
अभिनेते सुनील बर्वे यांनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.
-
अभिनेत्री स्पृहा जोशीने देखील मतदानाचं कर्तव्य बजावलं आहे.
-
दिग्दर्शक परेश मोकाशी व अभिनेत्री-लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी फोटो शेअर करत मतदान करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.
-
स्वप्नील जोशी व त्याची पत्नी यांनी देखील मुंबईत मतदान केलं आहे.
-
प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी यांनी मतदानाचा फोटो शेअर करत हा आपला सांविधानिक हक्क आहे सर्वांनी तो बजावलाच पाहिजे असं म्हटलं आहे.
-
“आधी मतदान मग बाकीचे काम” म्हणत प्राजक्ता माळीने देखील तिचं मतदानाचं कर्तव्य बजावलं आहे.
-
पृथ्वीक प्रताप, अनघा अतुल, अभिजीत खांडकेकर, किशोरी अंबिये, रवी जाधव अशा सगळ्याच कलाकारांनी आज मतदान केलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : संबंधित कलाकारांचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट )

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का