-
छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’मराठीला ओळखलं जातं.
-
पाचवा सीझन केव्हा येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.
-
अखेर सर्वांची प्रतीक्षा आता संपली असून कलर्स मराठी वाहिनीने ‘बिग बॉस’मराठीच्या पाचव्या सीझनची अधिकृतरित्या घोषणा केलेली आहे.
-
फक्त यावेळी होस्ट म्हणून महेश मांजरेकरांच्या ऐवजी एका नव्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे.
-
‘बिग बॉस मराठी’चं होस्टिंग बॉलीवूडचा स्टार आणि प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे.
-
“मराठी मनोरंजनाचा ‘BIGG BOSS’ सर्वांना ‘वेड’ लावायला येतोय…’लयभारी’ होस्ट, सुपरस्टार रितेश देशमुख!” असं कॅप्शन वाहिनीने पहिल्या प्रोमोला दिलं आहे.
-
रितेश देशमुखवर सध्या सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
जिनिलीया देशमुखने सुद्धा ‘बिग बॉस’चा प्रोमो शेअर करत रितेशला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
प्रेक्षकांचा हा आवडता शो लवकरच भेटीला येणार आहे. प्रक्षेपणाची तारीख आणि वेळ वाहिनीकडून लवकरच जाहीर करण्यात येईल. ( सर्व फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी इन्स्टाग्राम )

दुबईतील वाळवंटात पोहोचलेल्या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?