-
ऐश्वर्या नारकर व त्यांचे पती अविनाश नारकर हे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहे.
-
या जोडप्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असतात.
-
ऐश्वर्या व अविनाश यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे.
-
५४ वर्षीय ऐश्वर्या खूप उत्साही आहेत आणि त्या अनेक ट्रेंडी रील्स बनवत असतात.
-
बऱ्याचदा अविनाश नारकरदेखील ऐश्वर्यांच्या रील्सचा भाग असतात.
-
दोघे सण-उत्सवांशिवाय फोटोशूटचे फोटोही शेअर करत असतात.
-
बऱ्याचदा ऐश्वर्या त्यांचे पतीबरोबरचे जुने फोटो शेअर करतात.
-
असेच काही फोटो व्हायरल होत आहेत.
-
या फोटोत दोन वेण्या घातलेल्या ऐश्वर्या खूपच वेगळ्या दिसत आहेत. तर अविनाश यांचाही लूक हटके दिसतोय.
-
यात ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांच्या लग्नाचे फोटोही आहेत.
-
नारकर जोडप्याच्या लग्नाला २८ वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
तेव्हाच्या फोटोंमुळेही ऐश्वर्या व अविनाश खूपच सुंदर दिसत आहेत.
-
या लोकप्रिय जोडप्याला एक मुलगा आहे. त्याचं नाव अमेय नारकर आहे.
-
अनेकदा ऐश्वर्या नारकर त्याच्याबरोबरचे फोटो शेअर करत असतात.
-
(फोटो सौजन्य — ऐश्वर्या नारकर व सेलिब्रिटी चार्म्स इन्स्टाग्राम अकाउंटवरून साभार)

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…