-
छोट्या पडद्यावर सर्वात गाजणारा आणि चर्चेत असणारा लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. या कार्यक्रमाचं नवं पर्व कधी येणार याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.
-
अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. याबाबत आता मालिकेने अधिकृतपणे अपडेट शेअर केली आहे. लवकरच ‘बिगबॉस मराठी’चे पाचवे प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या पर्वात प्रेक्षकांना अनेक बदल पाहायला मिळणार आहेत.
-
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात प्रेक्षकांना काही खास गोष्टी पाहायला मिळतील. यंदा शोमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे.
-
आतापर्यंतचे चार सीझन ‘बिग बॉस मराठी’चं होस्टिंग दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलं होतं. मात्र, आता ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख सांभाळणार आहे.
-
यासंबंधीची अधिकृत घोषणा कलर्स वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर करण्यात आली असून कार्यक्रमाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.
-
या बातमीनंतर चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून त्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजण रितेशच्या ‘बिगबॉस’चा होस्ट म्हणूनच्या निवडीवर अतिशय आनंदी असून काहीजण महेश मांजरेकर हेच उत्तम होस्ट असल्याचे म्हणत आहेत.
-
रितेश देशमुख आता ‘बिगबॉस मराठी 5’ चे सूत्रसंचालन करणार असून या बातमीवर चाहत्यांनी के प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया.
-
एका चाहत्याने म्हटलं आहे, “महेश मांजरेकर हे शिस्तप्रिय होस्ट होते. रितेशला हे शिवधनुष्य पेलता आले तर चांगले.”
-
तर दुसऱ्या चाहत्याने म्हटले आहे, “महेश मांजरेकर जशी शाळा घ्यायचे तशी रितेशला घ्यायला जमणार नाही.”
-
एकाने असेही म्हटले आहे की होस्ट म्हणून महेश मांजरेकर हेच हवे होते.
-
तर दुसऱ्याने असेही म्हटले आहे की हा बदल केवळ एकाच पर्वापुरता आहे. रितेशबद्दल स्पर्धकांना भीती नसेल. ही भीती फक्त महेश मांजरेकर यांना बघूनच वाटते.
-
अशा प्रकारे कमेंटच्या माध्यमातून चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मात्र रितेश यंदाच्या पर्वाची लोकप्रियता आणखीन वाढवणार का हे कार्यक्रम सुरू झाल्यावरच पाहायला मिळेल. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
![IND vs ENG Shubman Gill touched his head after Adil Rashid clean bowled Axar Patel video viral](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-75.jpg?w=300&h=200&crop=1)
IND vs ENG : स्वत:ची विकेट पाहून अक्षरही अवाक्, गिलने तर डोक्यालाच लावला हात; आदिलच्या जादुई चेंडूचा VIDEO व्हायरल