-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमामुळे अनेक कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले.
-
अभिनेता दत्तू मोरेला सुद्धा हास्यजत्रेमुळे घराघरांत एक नवीन ओळख मिळाली.
-
विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
-
दत्तू मोरेने गेल्यावर्षी लग्नगाठ बांधत एका नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. नुकताच त्याने लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.
-
दत्तू मोरेला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त पत्नी स्वातीने नवीकोरी बाईक गिफ्ट केली आहे.
-
दत्तूने या बाईकची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
-
दत्तूने या पोस्टला “लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट…खूप खूप थँक्यू बायको” असं कॅप्शन दिलं आहे.
-
अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओवर वनिता खरात, निखिल बने यांनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
दत्तू आणि स्वातीने २३ मे २०२३ रोजी गुपचूप लग्नगाठ बांधली होती. नुकतंच त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : दत्तू मोरे इन्स्टाग्राम )

नागपुरात दंगल नेमकी कशामुळे भडकली ? असा आहे घटनाक्रम