-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात.
-
या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर ‘अरुंधती’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
नुकेतच मधुराणीने ‘राजसी’ या ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले आहे.
-
‘राजसी’ म्हणजे हातमागावर विणलेल्या साड्या, ओढण्या आणि उपरण्यांवर, प्राचीन भारतीय मंदिरांची व शिल्पांची चित्रं काढून भरतकाम केले जाणारा नवाकोरा ब्रॅण्ड असे कॅप्शनमध्ये मधुराणीने लिहलं आहे.
-
या फोटोशूटसाठी मधुराणीने सुंदर साडी नेसली आहे.
-
मधुराणीच्या साडीवर कर्नाटकामधील हम्पी येथील प्राचीन भारतीय शिल्पाची प्रतिकृती आहे.
-
मधुराणीच्या या साडीतील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘अतिशय मनमोहक…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)
![Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/New-Project-24-1.jpg?w=300&h=200&crop=1)
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली