-
जान्हवी कपूर शिखर पहारियाला डेट करत आहे.
-
करण जोहरच्या शोमध्ये प्रेमाची कबुली दिल्यानंतर अनेकदा शिखर व जान्हवी एकत्र देवदर्शनाला जातात.
-
जान्हवी शिखरवरचं तिचं प्रेम जाहीरपणे व्यक्त करत असते.
-
इतकंच नाही तर जान्हवी शिखरच्या कुटुंबाबरोबरही वेळ घालवताना दिसते.
-
काही दिवसांपूर्वी जान्हवी शिखरची आई स्मृती पहारिया यांच्याबरोबर सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी चालत गेली होती.
-
आता जान्हवीने होणाऱ्या सासूबाईंसाठी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.
-
जान्हवी स्मृती शिंदे पहारिया यांना ‘Aunty’ म्हणते.
-
स्मृती शिंदे या मालिकांची निर्मिती करतात.
-
आजपासून त्यांची ‘माटी से बंधी डोर’ नावाची मालिका सुरू होतेय, या मालिकेचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर करत जान्हवीने त्यांना शुभेच्छा दिल्या. “तुमचा खूप अभिमान वाटतो” असं लिहून तिने स्मृती शिंदेंना टॅग केलंय.
-
स्मृती शिंदे पहारिया या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत.
-
आमदार प्रणिती शिंदे शिखर पहारियाच्या मावशी आहेत.
-
स्मृती यांचे पती संजय पहारिया हे बिझनेसमन आहेत.
-
शिखर पहारियाला वीर नावाचा भाऊ असून तो लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
-
(सर्व फोटो – जान्हवी कपूर व स्मृती शिंदे इन्स्टाग्राम)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य