-
भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी अभिनेत्री-मॉडेल नताशा स्टॅनकोविक हे जोडपं वेगळ होणार असल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर उधाण आलं आहे.
-
हार्दिक-नताशा घटस्फोट घेणार असल्याची बातमी वणव्सारखी सगळीकडे पसरली आहे. या दरम्यान नताशा सोशल मीडियावर सक्रिय आहे.
-
२५मे रोजी Reddit वर एक पोस्ट आली होती, ज्यानुसार नताशाने इंस्टाग्रामवर हार्दिकसोबतचे तिचे काही जुने फोटो डिलीट केले आहेत तर तिच्या युजरनेममधून पंड्या हे नाव देखील काढून टाकले आहे.
-
घटस्फोटानंतर हार्दिकची ७० टक्के प्रॉपर्टी नताशाच्या नावावर होईल, अशी चर्चा आहे. तर हार्दिकची प्रॉपर्टीही त्याच्या आईच्या नावे असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. यावरून अनेक रिल्स , व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
चार वर्षांपूर्वी हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक हे विवाहबंधनात अडकले होते. त्यांना अगस्त्य नावाचा एक मुलगाही आहे.
-
मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सारंकाही आलबेल नसून लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात हार्दिक किंवा नताशा या दोघांकडूनही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
-
मुळची सर्बियन अभिनेत्री, मॉडेल आणि नृत्यांगना असलेली नताशा स्टॅनकोविक भारतीय मनोरंजन उद्योगातील तिच्या कामासाठी प्रसिद्ध आहे.
-
बिग बॉस 8 मधील सहभागी झालेल्या नताशाने ‘बिगबॉस १३’ फेम अभिनेता अली गोनीला डेट केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नताशाची लोकप्रियता कशाप्रकारे वाढत गेली ते पाहूया.
-
४ मार्च १९९२ रोजी सर्बियामध्ये नताशा स्टॅनकोविचचा जन्म झाला. ३२ वर्षीय नताशाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केली आणि नंतर बॉलीवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी ती भारतात आली.
-
२०१३ साली प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तसेच ती अजय देवगणसोबत ‘आयो जी’ या डान्स नंबरमध्ये दिसली होती.
-
बादशाह आणि आस्था गिल यांच्या लोकप्रिय डान्स नंबर ‘डीजे वाले बाबू’ या गाण्यानंतर ती आणखी लोकप्रिय झाली.
-
२०१४ साली तिने लोकप्रिय रिॲलिटी टीव्ही शो ‘बिग बॉस’मध्ये भाग घेतला. जवळपास एक महिनाती या घरात राहिली.
-
यानंतर नच बलियेच्या 9व्या सीझनमध्ये ती तिचा तत्कालीन बॉयफ्रेंड अली गोनीसोबत दिसली होती.
-
हार्दिकला डेट करण्यापूर्वी नताशा अली गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ते का ब्रेकअप झाले याचे कारण स्पष्ट नसले तरीही अहवालानुसार, पूर्णपणे भिन्न पार्श्वभूमी आणि संस्कृतीमुळे ते विभक्त झाले असल्याचे सांगितले जाते.
-
नच बलिए सीझन 9 मध्ये एकत्र दिसल्यानंतर काही दिवसांनी नताशा आणि अली गोनी यांचा ब्रेकअप झाला. मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की सांस्कृतिक मतभेदांमुळे ते वेगळे झाले आहेत.
-
खराब कामगिरी, मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद स्वीकारल्यानंतर आलेलं अपयश आणि भारतीय संघातील समावेशाबाबतची अनिश्चितता या सर्व पार्श्वभूमीवर हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
-
इतकंच नाही तर हार्दिक पंड्याला घटस्फोटानंतरची पोटगी म्हणून नताशाला त्याच्या संपत्तीतील तब्बल ७० टक्के हिस्सा द्यावा लागणार असल्याचंही बोललं जात आहे.
-
हार्दिकची संपत्ती जवळपास दीडशे कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे नताशाला मिळणाऱ्या कोट्यवधींच्या पोटगीची चर्चा होत आहे.
-
१ जानेवारी २०२० रोजी दोघांनीही ते रिलेशनशिपमध्ये असून त्यांनी साखरपुडा केल्याचे जाहीर केले होते. नंतर ३१ मे २०२० रोजी लॉकडाऊनमध्ये दोघांनी लग्न केले. त्याच वर्षी ३० जुलै रोजी त्यांना अग्स्त्य नावाचा मुलगा झाला.
-
लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनी पंड्या आणि नताशा यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केले. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उदयपूरमध्ये केलेल्या विवाहात दोन्ही पध्दतीने रितीरावाजाप्रमाणे लग्न केले.
-
यावेळी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. नताशाने तिच्या युट्युबवर त्यांच्या लग्नाचे व्हीडिओ शेअर केले होते.

“बलुचिस्तानच्या जन्माची वेळ…”, निवृत्त मेजर जनरल बक्षी यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “स्थिती पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर”