-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने गेल्या वर्षी कर्जतमध्ये आलिशान फार्महाऊस खरेदी केले.
-
प्राजक्ताने तिच्या फार्महाऊसला ‘प्राजक्तकुंज’ असे नाव दिले आहे.
-
नुकतेच प्राजक्ताने कर्जतच्या या फार्महाऊसमध्ये खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ताने पांढऱ्या रंगाचा को-ऑर्ड सेट परिधान केला आहे.
-
प्राजक्ताच्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘आम्हाला पण बोलवा कधी तरी…’ अशी कमेंट केली आहे.
-
प्राजक्ताचे हे फार्महाऊस कर्जतमध्ये डोंगराच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे.
-
प्राजक्ताच्या फार्महाऊसचे एका दिवसाचे भाडे वीकेंडला (शनिवार-रविवार) ३० हजार रुपये आहे.
-
सोमवार ते शुक्रवारदरम्यान एका दिवसाचे भाडे १७ ते २० हजार रुपये आहे.
-
या फार्महाऊसमध्ये एकावेळी १५ जण राहू शकतात.
-
सध्या प्राजक्ता सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात सूत्रसंचालन करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’