-
भारताचे मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजिक शैला मर्चंट यांची लेक राधिका मर्चंट हिच्याशी अनंत अंबानी लग्नगाठ बांधणार आहे.
-
काही महिन्यांपूर्वीच अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा १ मार्च ते ३ मार्चपर्यंत पार पडला होता. तीन दिवसांच्या या प्री-वेडिंग सोहळ्याला सेलिब्रिटींसह उद्योग जगतातील दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा रंगला आहे.
-
आजपासून अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याला सुरुवात झाली आहे. १ जूनपर्यंत हा सोहळा असणार असून विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत.
-
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा क्रूझवर होणार आहे. इटली ते फ्रान्स असा प्रवास करत हा प्री-वेडिंग सोहळा होणार आहे.
-
अभिनेता सलमान खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर, आलिया भट्ट असे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी प्री-वेडिंग सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी इटली गेले आहेत. या क्रूझवर ८०० पाहुण्यांसह ६०० कर्मचारी देखभालीसाठी क्रूझवर उपस्थित असणार आहेत.
-
अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यातील फोटो ओरीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत; जे सध्या चांगले व्हायरल झाले आहेत.
-
बॉलिवूड सेलिब्रिटींचा खास मित्र ओरहान अवतारमणी उर्फ ओरीने क्रूझवरील फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलिशान क्रूझ पाहायला मिळत आहे. पहिल्या फोटोमधून समुद्राच्या लाटा आणि मावळतीचा सूर्याचं अप्रतिम दृश्य दिसत आहे. याशिवाय क्रूझच्या आतमध्ये एका टेबलवर हुक्का पॉट, काचेचे ग्लास ठेवलेले पाहायला मिळत आहेत.
-
दुसऱ्या फोटोमध्ये बेडरुम दिसत आहे. या बेडरुमच्या खिडकीतून इटलीचा निळाशार समुद्र पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत ओरीने “परफेक्ट मॉर्निंग”, असं लिहिलं आहे.
-
तिसऱ्या फोटोमध्ये इटलीचा सुंदर समुद्र किनारा दिसत आहे.
-
तिसऱ्या फोटोमध्येही इटलीचा सुंदर समुद्र किनारा पाहायला मिळत आहे.
-
ओरीने शेअर केले क्रूझवरील हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
-
अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंग सोहळ्यामधील ओरीचे रिहानाबरोबरचे फोटो देखील खूप व्हायरल झाले होते. (सर्व फोटो सौजन्य – ओरी इन्स्टाग्राम आणि सोशल मीडिया)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”