-
आज आपण एका अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत, ज्याने आपल्या करिअरमध्ये तब्बल ३० फ्लॉप चित्रपट दिले आहेत, परंतु यानंतरही तो खूप ऐशोआरामात जगतो. (@आफताब शिवदासानी/FB)
-
या अभिनेत्याचं नाव आफताब शिवदासानी आहे. त्याने बॉलीवूडमध्ये चांगली सुरुवात केली होती, परंतु नंतर फ्लॉप चित्रपटांची जणू रांग लावली.
-
‘हंगामा’, ‘ग्रँड मस्ती’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ आणि ‘क्या कूल हैं हम’ यांसारख्या चित्रपटांतील आपल्या व्यक्तिरेखेसाठी प्रसिद्ध झालेल्या आफताब शिवदासानीची संपत्ती कोट्यवधी रुपये आहे.
-
आफताब शिवदासानीचा जन्म १९७८ साली मुंबईत झाला. त्याने वयाच्या ९व्या वर्षी अनिल कपूरच्या ‘मिस्टर इंडिया’ या सुपरहिट चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली.
-
त्याने १९८८ मध्ये आलेल्या ‘शहेनशाह’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. ‘मस्त’ या चित्रपटातून त्याने मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि हा ब्रेक आफताबला राम गोपाल वर्मा यांनी दिला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.
-
यानंतर त्यांचे काही चित्रपट हिट झाले पण मुख्य अभिनेता म्हणून तो बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेता होऊ शकला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आफताब शिवदासानीने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत एकूण ४० फ्लॉप चित्रपट दिले आहेत.
-
आफताब शिवदासानी भलेही चित्रपट जगतापासून दूर असला तरी तो ऐशोआरामात जीवन जगतो. त्याच्याकडे मुंबईत एक अपार्टमेंट तसेच अनेक आलिशान गाड्या आहेत. १.९ कोटी रुपयांची ऑडी आरएस 5 आणि १.२२ कोटी रुपयांची BMW X6 व्यतिरिक्त, अभिनेत्याकडे इतर अनेक आलिशान कार आहेत.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार आफताब शिवदासानी त्याच्या प्रोडक्शन हाऊस आणि इतर कार्यक्रमांमधून दरवर्षी सुमारे तीन कोटी रुपये कमवतो.
-
आफताब सुमारे ५१ कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. (फोटो – आफताब शिवदासानी इन्स्टाग्राम)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO