-
चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी खूप संघर्षानंतर यश मिळवलं. असाच एक अभिनेता आहे जो एकेकाळी आमिर खानचा बॉडीगार्ड असायचा. त्याला टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम मिळालं नाही, तेव्हा त्याने बारटेंडर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. (@रोनित रॉय/सोशल मीडिया)
-
या अभिनेत्याच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा त्याच्याकडे घराचे भाडे द्यायलाही पैसे नव्हते. त्या दिवसांत तो त्याच्या गाडीत झोपायचा. त्यानंतर एक वेळ अशी आली जेव्हा त्याने आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मनं जिंकली. त्याला छोट्या पडद्यावरील अमिताभ बच्चनही म्हटलं जाऊ लागलं.
-
हा अभिनेता म्हणजे रोनित रॉय आहे. तो मुंबईत आला तेव्हा त्याच्या खिशात फक्त सहा रुपये होते. पैसे कमावण्यासाठी तो एका हॉटेलमध्ये बारटेंडर म्हणून काम करू लागला. तिथे त्याने भांडीही धुतली आणि टेबल साफ केले.
-
१९९२ मध्ये त्याने ‘जान तेरे नाम’ मधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. पण त्यानंतर त्याला सहज काम मिळालं नाही, त्याला खूप संघर्ष करावा लागला. तो आर्थिक संकटाचा काळ होता, असं रोनितने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
-
एकवेळ अशी आली की त्याच्याकडे खोलीचं भाडं देण्यासाठीही पैसे नव्हते, त्यानंतर रोनित रॉय गाडीत झोपू लागला. तो आंघोळ करण्यासाठी जुहू येथील सार्वजनिक शौचालयात जात असे.
-
या काळात त्याने दोन वर्षे आमिर खानचा बॉडीगार्ड म्हणून काम केलं. बॉडीगार्ड असताना आमिर खानकडून रोनित रॉयला खूप काही शिकायला मिळाले. ही दोन वर्षे तो खूप मौल्यवान मानतो.
-
या काळात रोनित रॉयने कठोर परिश्रम सुरूच ठेवले आणि २००० मध्ये त्याला ‘कसौटी जिंदगी’ आणि ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ सारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. यानंतर तो घराघरात ओळखला जाऊ लागला.
-
रोनित रॉय २००० साली प्रति एपिसोड सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता होता. त्यावेळी तो एका एपिसोडसाठी ५० हजार रुपये घेत असे.
-
२०१० मध्ये रोनित रॉयचा ‘उडान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. यानंतर, त्याने 2 स्टेट्स, स्टुडंट ऑफ द इयर, बॉस आणि काबिल सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलंय.
-
रोनित रॉय सध्या टीव्ही शोसाठी प्रति एपिसोड १.२५ लाख रुपये घेतो. तर तो चित्रपटासाठी सुमारे एक कोटी रुपये मानधन घेतो.
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश