-
१९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सल्तनत’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. जूहीने शाहरुख खान, आमिर खान आणि अनिल कपूरबरोबर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (PC : Juhi chawla Insta)
-
९० च्या दशकात जूहीने अनिल कपूरबरोरबर अनेक चित्रपट केले होते. अनिल आणि जूहीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत होती. या दोघांनी ‘अंदाज’ (१९९४) या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. (PC : Youtube Video ScreenShot)
-
या चित्रपटात अनेक द्वयर्थी संवाद होते. या चित्रपटात एक वादग्रस्त गाणंदेखील होतं. ‘खडा हैं, खडा है’ असे या गाण्याचे बोल होते. (PC : Youtube Video ScreenShot)
-
अनिल कपूरबरोबर या गाण्याचं चित्रीकरण संपल्यानंतर जूही बराच वेळ धाय मोकलून रडत होती. तसेच तिने रागाच्या भरात या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, असं अनिल कपूरने नुकतंच एका कार्यक्रमात सांगितलं. (PC : chawla Insta)
-
अनिल कपूर आणि त्याची मुलगी अभिनेत्री सोनम कपूर हे दोघे नुकतेच दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. (PC : Anil Kapoor/FB)
-
या कार्यक्रमात करणने अनिलला विचारलं की, तुझ्या कारकिर्दीतलं सर्वात त्रासदायक गाणं कोणतं होतं? यावर अनिल म्हणाला, ‘खडा हैं, खडा हैं’ हे माझ्या एका चित्रपटातलं गाणं खूप वाईट होतं. (PC : Anil Kapoor/FB)
-
अनिल कपूर म्हणाला, “त्या गाण्याचं चित्रीकरण संपल्यावर जूही धाय मोकलून रडत होती. तिने जवळपास हा चित्रपट सोडून दिला होता. चित्रीकरण थांबलं होतं. नंतर हा चित्रपट कसाबसा पूर्ण झाला.” (PC : Anil Kapoor/FB)
-
जूहीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “चित्रपटाची पटकथा वाचून मी दिग्दर्शक डेव्हिड धवन यांना या गाण्यासाठी नकार दिला होता. मात्र सेट तयार होता, गाण्याची सगळी तयारी झाली होती, म्हणून मी शेवटच्या क्षणी या गाण्याचं चित्रीकरण करण्यास होकार दिला”.(PC : Juhi chawla Insta)
-
जूही म्हणाली, “गाण्याचं चित्रीकरण संपल्यावर मी माझ्या खोलीत जाऊन खूप रडले होते. मला त्या गाण्याचं चित्रीकरण करताना खूप लाज वाटत होती. या गाण्याचे बोल इतके घाणेरडे होते की, मला त्यावर नाचता येत नव्हतं, चेहऱ्यावर हावभाव आणता येत नव्हते.” (PC : Juhi chawla Insta)
