-
आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील एका सुपरस्टारबद्दल सांगणार आहोत, जे गरीबांना मदत करतात. असं म्हणतात की या सुपरस्टारचा नंबर भिकाऱ्यांजवळही आहे. त्यांनी केव्हाही मदत मागितली तर हा सुपरस्टार एका फोन कॉलवर त्या भिकाऱ्यांजवळ पोहोचतो. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
हा सुपरस्टार दुसरा-तिसरा कोणी नसून चित्रपटसृष्टीत जग्गू दादा या नावाने प्रसिद्ध असलेले जॅकी श्रॉफ आहेत. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
जॅकी श्रॉफ यांचे बालपण त्यांच्या कुटुंबासह मुंबईतील एका चाळीत गेले. गरिबीमुळे त्यांना शिक्षणही पूर्ण करता आले नाही. ८० च्या दशकात जॅकी श्रॉफ सुपरस्टार झाल्यानंतरही त्यांनी चाळच्या आठवणी मनात जपल्या. (इंडियन एक्सप्रेस)
-
हिरो होण्याआधी जॅकी श्रॉफ कधी हॉटेलमध्ये काम करायचे, तर कधी थिएटरबाहेर शेंगदाणे विकायचे. त्यांनी पोस्टर लावण्याचीही कामं केली. जे काही काम मिळेल ते काम जॅकी श्रॉफ करायचे. (इंडियन एक्सप्रेस)
-
एके दिवशी ते बस स्टँडवर उभे असताना एका व्यक्तीची त्यांच्याशी टक्कर झाली. जॅकी श्रॉफ यांची उंच शरीरयष्टी आणि आकर्षक चेहरा पाहून त्या व्यक्तीने त्यांना मॉडेलिंगची ऑफर दिली. त्या बदल्यात पैसे मिळतील का, अशी विचारणा जग्गू दादाने केली. इथूनच त्याच्या नशिबाने कलाटणी घेतली आणि काही वेळातच ते इंडस्ट्रीतील सुपरस्टार कलाकारांपैकी एक बनले. (इंडियन एक्सप्रेस)
-
एवढ्या यशानंतरही जॅकी श्रॉफ आपली चाळ विसरले नाहीत, त्यांनी गरिबी अगदी जवळून पाहिली होती. यामुळेच ते नेहमीच गरिबांच्या मदतीसाठी तत्पर असतात. (इंडियन एक्सप्रेस)
-
मुंबईतील तीन बत्ती बालेश्वर भागातील चाळीत जॅकी श्रॉफ राहत होते, तिथून ते पाली हिलपर्यंतच्या जवळपास प्रत्येक भिकाऱ्याजवळ जॅकी श्रॉफ यांचा फोन नंबर आहे. त्यांना गरज असेल तेव्हा ते फोन करतात आणि जॅकी श्रॉफ तिथे पोहोचतात, असं म्हटलं जातं. (इंडियन एक्सप्रेस)
-
इतकंच नाही तर जॅकी श्रॉफ यांच्याबद्दल असंही म्हटलं जातं की, मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नावावर गरिबांसाठी स्वतंत्र अकाउंट आहे. त्यांच्या पैशांमधून १०० हून अधिक गरीब कुटुंबांना आर्थिक मदत मिळते. (इंडियन एक्सप्रेस)
-
जॅकी श्रॉफ यांचा पहिला चित्रपट ‘हीरो’ सुपरहिट ठरला होता. मात्र त्यानंतरही ते ५ ते ६ वर्षे चाळीतच राहायचे आणि सकाळी बाथरूमबाहेर रांगेत उभे असायचे. (इंडियन एक्सप्रेस)
-
जॅकी श्रॉफ यांच्याकडे आज सुमारे २१२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांची मुंबईत अनेक घरं आहेत. याशिवाय अभिनेत्याकडे BMW M5, Bentley Continental GT, Jaguar SS 100 आणि BMW 5 सीरीज सारख्या अनेक लक्झरी कारचे कलेक्शन आहे. (@जॅकी श्रॉफ/एफबी)

२८ फेब्रुवारी राशिभविष्य: महिन्याचा शेवटचा दिवस ‘या’ तीन राशींचे भाग्य पालटणार? कोणाला कामातून आनंद तर कोणाला अनपेक्षित लाभ होणार